उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत खा.चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड,बातमी24:- भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. जुना मोंढा येथील टाॅवर पासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,खा.अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, खासदार […]

आणखी वाचा..

 खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज होणार दाखल;फडणवीस,बावनकुळे,दानवे आदींची उपस्थिती राहणार

नांदेड,बातमी24:-नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज गुरूवार दि.4 एप्रिल 2024 रोजी दाखल करणार आहे. यावेळी खा.चिखलीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता गुरुद्वारा मैदान रेल्वे स्टेशन रोड (हिंगोली गेट) नांदेड येथील मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, ना. भागवत […]

आणखी वाचा..

शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल; अमित देशमुख वगळता अन्य प्रदेश नेत्यांची पाठ

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी बुधवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी लोकांची लक्षणीय हजेरी होती.माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती यावेळी राहिली. यावेळी जुना मोंढा येथून रॅली काढण्यात आली.अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेत हिंगोली गेट येथील मैदानावर झाले.यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले,की नांदेड ने लातूरला […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद सीईओ यांचे स्वीय सहाययक म्हणून नागमवाड रुजू

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मीनल करणवाल यांचे स्वीय सहाययक म्हणून बालाजी नागमवाड हे आजपासून रुजू झाले आहेत. अभय नलावडे यांची ए. बीडीओ म्हणून पदोन्नतीने मनरेगा नांदेड येथे बदली झाली. रिक्त झालेल्या स्वीय सहाययक या जागी नागमवाड हे कामकाज पाहणार आहेत. बालाजी नागमवाड यांची 34 वर्षाची सेवा झाली असून त्यांनी यापूर्वी कृषी,सामान्य प्रशासन […]

आणखी वाचा..

वंचीतकडून नांदेडला लिंगायत उमेदवार

नांदेड,बातमी24: नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा वंचीत बहुजन आघाडीकडून करण्यात आली,असून अविनाश भोसीकर यांच्या रूपाने लिंगायत समाजाला प्राधान्य देण्यात आले. मागच्या काही दिवसापासून नांदेडला वंचीतचा उमेदवार कोण असणार याकडे नजरा लागल्या होत्या.दोन दिवसांपूर्वी वंचीतने काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना पाठींबा दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.मात्र याबाबत वंचीतकडून पत्रकार परिषद घेऊन खंडन करण्यात आले. आज रात्री अविनाश […]

आणखी वाचा..

प्रशिक्षणाला दांडया मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार:बैठकीत गैरहजर कर्मचाऱ्यांवर नाराजी

नांदेड,बातमी24 : निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज होत असताना काही कर्मचारी प्रशिक्षणाला अनुपस्थितीत राहत आहेत.अशा सर्व कर्मचाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष असून अशा जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. लोकशाही यंत्रणेमध्ये सर्वात महत्त्वाचे पर्व असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक विभागाचे कसून प्रशिक्षण दिले जात आहे स्वतः जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी या काळात 24 […]

आणखी वाचा..

सावधान ! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्‍ट, फेकन्‍यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

नांदेड,बातमी 24 – लोकसभा निवडणुकीच्‍या काळात माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्‍ये सदस्‍य असणा-या सायबर विभागाच्‍या मार्फत जिल्‍ह्यातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्‍यापासून गेल्‍या 18 दिवसांत दिड हजारावर अकांऊट तपासण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सावधानी बाळगण्‍याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. समाज माध्‍यमे सर्वाच्‍या हाती असून याचा दुरुपयोग होता […]

आणखी वाचा..

आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी.24 :- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. माध्यमांनी विशेषतः समाज माध्यमांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. आचारसंहिता लागताच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रसिद्धी साहित्याला संबंधित यंत्रणांनी काढून टाकावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. सोशल माध्यमांवर काम करणाऱ्या […]

आणखी वाचा..

भंडारे व महाप्रसाद वाटप करणाऱ्यां आयोजकांना जिल्‍हाधिकाऱ्यांनी सूचना

नांदेड,बातमी 24 :- उद्या होणाऱ्या शिवरात्री निमित्त विविध ठिकाणी उद्या आयोजित होणाऱ्या भंडारामध्ये महाप्रसाद सेवन करणाऱ्यांनी व महाप्रसाद वाटप करणाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विषबाधा होणार नाही, अन्न सेवन करणाऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी व्यक्तिगतरीत्या काळजी घ्यावी तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नांदेड जिल्‍ह्यात गत काही […]

आणखी वाचा..