नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दणक्यात वाढला आहे. एक दिवसाच्या अंतरानंतर कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी शंभरीपार गेली आहे. तर गत चौविस तासात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील गुरुवार दि. 30 जुलै रोजी तब्बल की कधी नव्हे इतक्या 656 चाचण्या गुरुवारी घेण्यात आल्या. यामध्ये 457 चाचण्यांचा अहवाल निगेटीव्ह आला, तर 117 स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीव्दारे 75 व अॅटीजंट किटव्दारे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 42 असे 117 रुग्ण पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 685 इतकी झाली आहे.
अॅटीजंट किटव्दारे नांदेड शहरातील जयभिम नगर भागात तपासण्या व्यापक प्रमाणात सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुधवारी या भागात 21 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुरुवारी सुद्ध चाचण्यांमध्ये 15 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये हदगावमध्ये तेरा रुग्ण कोरोनाचे सापडले.
गुरुवारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील 19, देगलूर-13, उमरी-10, खासगी -6, मुखेड-7 व बिलोली येथील -1 असे 56 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 846 झाली आहे.
——
पाच जणांचा मृत्यू
कंधार तालुक्यताील हयापुर येथील 65 वर्षीय महिलेचा दि.29 रोजी मृत्यू झाला. देगलूर येथील आझाद कॉलनी भागातील 68 वर्षीय पुरुषाचा दि. 29 रोजी, वजिराबाद भागातील 40 वर्षीय पुरुषाचा दि. 29 रोजी तर नांदेड तालुक्यातील नेरली येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि. 30 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 78 झाली आहे.