जिल्ह्यातील मृतांची संख्या चारशे

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी दि. 28 एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर भागातील ठरला. त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल चारशे जणांना कोरोनाच्या संसर्गाने गिळकत केले आहे.

मंगळवार दि. 29 रोजी आलेल्या अहवालात चार जणांच्या मृत्यूशी जिल्ह्यातील मृतांचा आकडा 398 इतका झाला आहे. त्याचसोबत 986 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 740 निगेटीव्ह तर 216 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 15 हजार 442 एवढी झाली, तर दिवसभराच्या काळात 225 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त रुग्ण संख्या 11 हजार 715 झाली. सध्या 3 हजार 242 जणांवर उपचार सुरु आहेत.
——
चार जणांचा मृत्यू

नांदेड शहरातील कल्याण नगर भागात राहणार्‍या 70 वर्षीय पुरुषाचा दि. 27 रोजी, नांदेड शहरातील जुना मोंढा 72 वर्षीय पुरुषाचा दि. 27 रोजी, सिडको भागातील 75 वर्षीय महिलेचा दि. 28, तर नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 67 वर्षीय पुरुषाचा दि. 29 रोजी मृत्यू झाला.