32 वर्षांच्या तरुणासह आठ जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24:- आज आलेल्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे.यात एक 32 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. तसेच 32 जण मृत्यूच्या दाढेत आहेत.

मंगळवार दि.6 रोजी आलेल्या अहवालात 839 नमुने तपासण्यात आले.यात 611 निगेटिव्ह तर 180 जण हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 16 हजार 632 एवढी झाली,तर यातील आतापर्यंत 13 हजार 213 जण कोरोना मुक्त झाले,आजच्या 205 रुग्णांचा सुद्धा समावेश आहे.2 हजार 879 रुग्णावर उपचार सुरू आहेत
———-
कौठा भागातील 75 वर्षीय पुरुषाचा दि.3 रोजी,लेबर कॉलोनी येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि.4 रोजी, व्यकटेश नगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.5 रोजी,भोकर तालुक्यातील चितगिरी येथील 85 वर्षीय पुरुषाचा दि.5 रोजी,कामठा येथील 57 वर्षीय पुरुषाचा दि.5 रोजी, नायगाव येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि.5 रोजी,मुखेड तालुक्यातील रावनगाव येथील 32 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी तर शहरातील छत्रपती नगर भागात राहणाऱ्या 60 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी मृत्यू झाला.आतापर्यंत कोरोनामुळे 439 झाली आहे.