नांदेड,बातमी24:- मागच्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गाने लावलेली घरघर मिटण्याचे नाव घेत नाही. अलिकडच्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणावर कोरोनाचे सावट गडद झाले,असून बैलपोळ्याच्या मिरवणुकावर बंदी असणार आहे.
मागच्या सहा महिन्यांच्या काळात एकही उत्सव साजरा झालेला नसून पुढील काळातील गणेश उत्सव,दुर्गा उत्सव तसेच दहीहंडी हे सण व उत्सव घरच्या घरी साजरे करण्याच्या सूचना आहेत.
त्याचप्रमाणे मंगळवार दि.18 ऑगस्ट रोजी होणारा पोळा उत्सव घरीच राहून साजरा करावा,बैल मिरवणुका काढू नये,जेनेकरून कोरोनाच्या संसर्गाला रोखता येऊ शकते,याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.